Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Oct 2021
Publication Type: eBook
Price: Rs.200.00
Click here to purchase the eBook on Amazon Kindle
हा ग्रंथ म्हणजे आई महिषासूरमर्दिनी चण्डिकेच्या वात्सल्याचाच आविष्कार. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंद्वारा विरचित हा ग्रंथ तिच्या कार्याची, चरित्र व हेतूची ओळख तर करून देतोच पण ह्या आईच्या मायेची जाणीव करून देऊन, तिचा पदर धरून रहाणे शिकवतो. श्रद्धावानांना तिच्या छत्रछायेचे आश्वासन देतो.
ह्या आईचे प्रेम मानवी जीवनाला सामर्थ्य पुरवणारी शक्ती आहे. शुभ तत्त्वाला होकार आणि अहिताला वेळीच ओळखून नकार देण्याची शक्ती; भक्ती व नैतिकता ह्यांना दृढ करणारी शक्ती आणि साहजिकच तिच्या पुत्राचे -परमात्म्याचे प्रेम प्राप्त करण्याचा, त्याच्या जवळ जाण्याचा मार्ग. तिचे रूप सौम्य असो की उग‘, ती भक्तप्रेमापोटीच व कार्यहेतूप्रमाणे ते धारण करते व तिची सर्व रूपे शुभच असून भक्तकल्याणासाठीच असतात. अंतत: सत्याचा, शुभाचाच विजय ती घडवून आणते.
गायत्रीमाता, आई महिषासूरमर्दिनी चण्डिका व अनसूया माता ह्या तीन स्तरावर कार्य करत असल्या तरी मूलत: एकच असतात.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात की हा ग‘ंथ आदिमातेचे गुणसंकीर्तनही आहे, ही ज्ञानगंगा आहे आणि भक्तीभागिरथीही आहे. सर्व श्रद्धावानांसाठी सर्व काळासाठी सद्गुरु श्रीअनिरुद्धबापूंनी दिेलेले आदिमातेच्या प्रेमाचे, रक्षणाचे आणि आधाराचे आश्वासन म्हणजे ‘मातृवात्सल्यविंदानम्’
Know more ...