Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: May 2020
Publication Type: eBook
Price: Rs.200.00
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू म्हणजे विविधांगी व वैशिष्ट्यपूर्ण पैलूंनी भरलेले एक अद्वितीय व्यक्तिमत्व! ह्या असाधारण व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा एक प्रयास म्हणून, ‘दैनिक प्रत्यक्ष’चे सन २०१२ व २०१३ चे ‘नववर्ष विशेषांक’ ‘मी पाहिलेला बापू’ ह्या विषयाला वाहिलेले होते. बापूंच्या शालेय जीवनापासून ते वैद्यकीय प्रॅक्टिसच्या काळात अनेकविध लोकांना त्यांचे सान्निध्य लाभले. अशा, बापूंच्या सान्निध्यात आलेल्या अनेकविध लोकांच्या, अनिरुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दाखविणाऱ्या, त्या काळातील आठवणी त्यांमध्ये शब्दांकित करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर काही मोजक्या व्यक्तिमत्वांच्या, अलिकडील काळातील आठवणींचाही त्यात समावेश करण्यात आला होता. बापूंच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारे ‘दैनिक प्रत्यक्ष’चे हे दोन्ही अंक अविस्मरणीय असेच ठरले होते.
ह्या सर्व लेखांचे संकलन असलेले, “मी पाहिलेला बापू” हे पुस्तक २०१७मध्ये गुरुपौर्णिमेच्या मंगल दिनी प्रथम मराठी व हिंदी ह्या दोन भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर अल्पावधीतच इंग्रजी भाषेतील पुस्तकही प्रकाशित झाले.