true
true

Products

Type:
Category:
Sold By:
Author:
Search:
Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Aug 2021
Publication Type: eBook
Price: Rs.150.00

Description

All the modern technology that has changed our lives for the better can be traced back to the research and inventions by an ingenious genius, ‘Dr Nikola Tesla’. A true legend that he was, terms such as Engineer, Inventor, Scientist, Physicist, Revolutionist, Visionary, Futurist fall short to describe the profound work and contributions made by this greatest scientist in the history towards the development of human kind.

Dr Nikola Tesla has to its credit, more than 700 patents and many more that he left unpatented with an intent to make them available for everyone. Moreover, there were many other astonishing discoveries and findings that he did not bring to light deliberately fearing the risk involved, if fallen into wrong hands. His ground-breaking inventions include Alternating Current, Peace Ray, humanoid robots, television, remote control, x-rays, wireless power transmission, Time Travel, to name a few. Dr Tesla also aspired to provide free electricity to the whole world. This creative genius found the breakthrough in harnessing the power of electricity, consequently laying the foundation of the Second Industrial Revolution. He was known as the inventor of the Electric Age.

Born in 1856, a Serbian American, Dr Tesla displayed his brilliance and exceptional abilities since childhood. Having grown up in a religious family, he had an unswerving faith in the Almighty. And it was his faith in God that kept him going and never let troubles weigh him down. His life story is an extraordinary series of triumphs and tribulations, marred by envy, competition and losses. Despite witnessing unprecedented success, amassing wealth was never his goal, instead Tesla refused to get bogged down by powerful heavyweights who wished to accomplish their diabolical intentions using his research. His then, contemporaries tried to destroy him by all means but failed to dampen his spirit. With his unparalleled grit and never-say-die attitude, he rose like phoenix never to look back again.

However, over the course of time, this inspirational story of such a visionary who was centuries ahead of his time was manipulated to fade into oblivion. In 2014, Sadguru Aniruddha (Dr Aniruddha Joshi, MD Medicine, fondly known as Aniruddha Bapu in his discourse spoke highly about this humble yet magnanimous personality. Thereafter, a series of articles covering all facets of Dr Nikola Tesla was published in a Marathi newspaper ‘Dainik Pratyaksha’. In the foreword of this book, Dr Aniruddha Joshi writes, “Several call him ‘God of Science’. If you ask me, Dr Nikola Tesla is indeed the greatest scientist the world has ever seen. Moreover, the chances of someone able to match his achievements in future are almost next to nil.”

This book celebrates the life and achievements of Dr Nikola Tesla. The book throws light not only on his stupendous findings and experiments but it also acquaints its readers with the human side of the man who dedicated his life for our betterment- Dr Nikola Tesla.

This book is a compilation of articles originally published in a Marathi newspaper ‘Dainik Pratyaksha’. The articles in this book are translated and reproduced for the benefit of the readers.

Sold By: Ishapashyanti Enterprises LLP
Publication Date: Aug 2021
Publication Type: eBook
Price: Rs.150.00

Description

Click here to purchase the eBook on Amazon Kindle

आपले आजचे जीवन अधिक सुखावह करणार्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचा जर मागोवा काढला तर त्याचे मूळ, अलौकिक बुद्धीमत्तेचे शास्त्रज्ञ डॉ. निकोल टेस्ला यांच्या संशोधनात आणि त्यांनी लावलेल्या विविध शोधांमध्ये आहे. अभियंता, संशोधक, वैज्ञानिक, भौतिकशास्त्रज्ञ, क्रांतीकारी बदल घडवणारा, दूरदर्शी, भविष्यवादी ही बिरुदावली मानवजातीच्या विकासासाठी या महान वैज्ञानिकाने केलेल्या कार्याचे आणि योगदानाचे वर्णन करण्यास कमी पडेल.

डॉ. टेस्ला यांच्या नावे सुमारे ७०० हून अधिक संशोधनांचे पेटंट आहेत, त्या व्यतिरिक्त त्यांचच्या इतर अनेक शोधांचा उपयोग सामान्य माणसाला पण व्हावा या उद्देशाने त्यांनी त्या शोधांचे पेटंटही काढले नाही. त्यांचे अनेक विस्मयकारक शोध व निष्कर्ष चूकीच्या हातामध्ये पडू नये या उद्देशाने त्यांनी ते जगासमोरच आणले नाहीत. जगात बदल घडवणार्‍या या त्यांच्या शोधांमध्ये अल्टरनेटिंग करंट (AC Current), पीस रे, ह्युमनॉइड रोबोट्स, टेलिव्हिजन (TV), रिमोट कंट्रोल, एक्स-रे, वायरलेस पॉवर ट्रान्समिशन, टाइम ट्रॅव्हल असे अनेक शोध आहेत. संपूर्ण जगाला फ्री इलेक्ट्रीसीटी देण्याची डॉ. टेस्ला यांची महत्वाकांक्षा होती. अलौकिक आणि सर्जनशील बुद्धीमत्ता लाभलेल्या या संशोधकाला विजेचे सामर्थ्य नियंत्रित करून त्याचा सुयोग्य वापर करण्याचे तंत्र उमगले होते, ज्यामुळे दुसर्‍या औद्योगिक क्रांतीचा पाया घातला गेला. म्हणूनच यांना इलेक्ट्रिक युगाचा शोधकर्ता म्हणून ओळखले जाते.

१८५६ मध्ये जन्मलेल्या सर्बियन अमेरिकन डॉ. टेस्ला यांनी बालपणापासूनच आपल्या विलक्षण बुद्धीमत्तेची आणि असाधारण क्षमतेची चूणुक दाखवली. त्यांची जडणघडण एका धार्मिक कुटुंबात झाली. त्यांचा परमेश्वरावर दृढ विश्वास होता. आणि ह्याच ठाम विश्वासामुळे घोर संकटातही ते कधीच डगमगले किंवा खचले नाहीत. त्यांची जीवनगाथा म्हणजे इतरांचा मत्सर, स्पर्धात्मक चढाओढी व नुकसानांनी ग्रासलेल्या यश व कष्टदायक प्रयासांची एक विलक्षण मालिकाच आहे. अभूतपूर्व यशाचे साक्षीदार असूनही केवळ पैसा कमावणे हे ध्येय त्यांचे कधीच नव्हते, त्याऐवजी डॉ. टेस्ला यांच्या संशोधानाची मदत घेऊन ज्या प्रभावी व प्रबळ व्यक्तींना त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा व हेतू साध्य करायचे होते त्यांच्या दबावाखाली येण्यास डॉ. टेस्ला यांनी नकार दिला. तेव्हाच्या समकालीन व्यक्तींनी त्यांना सर्व प्रकारे नामोहरम करण्याचा प्रयत्न केला परंतू डॉ. टेस्ला यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती्पुढे ते हतबल झाले. अतुलनीय धैर्य आणि कधीही हार न मानणार्‍या वृत्तीमुळे डॉ. टेस्ला यांनी पुन्हा फिनीक्ससारखी भरारी घेतली व नंतर पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

तथापि आपल्या काळाच्याही कित्येक शतकांनी पुढे असणार्‍या या द्रष्ट्र्या वैज्ञानिकाची प्रेरणादायक कहाणी काळाच्या ओघात विस्मृतीत जावी म्हणून जाणीवपूर्वक योग्य प्रकारे जगासमोर आणली गेली नाही. इ.स. २०१४ मध्ये, सदगुरु श्री अनिरुद्ध (डॉ. अनिरुद्ध जोशी - एम.डी. मेडिसिन, म्हणजेच अनिरुद्ध बापू) आपल्या प्रवचनात या नम्र परंतु महान व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलले. त्यानंतर डॉ. निकोल टेस्ला यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा वेध घेणार्‍या लेखांची मालिका ‘दैनिक प्रत्यक्ष’ या मराठी वृत्तपत्रात प्रकाशित झाली. या पुस्तकाच्या अग्रलेखात डॉ. अनिरुद्ध जोशी लिहितात, “अनेकजण त्यांना‘ विज्ञानाचा ब्रह्मर्षि’ म्हणतात. जर तुम्ही मला विचारले, तर डॉ. निकोल टेस्ला हे जगाने जाणलेले या काळातले सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक आहे. शिवाय, भविष्यात त्यांच्याएवढी तुल्यबळ व्यक्ती सापडणे हे अशक्य असेल.”

या पुस्तकाद्वारे डॉ. निकोल टेस्ला यांच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा परिचय वाचकांना होईल. हे पुस्तक केवळ त्यांच्या विस्मयजनक शोधांवर आणि प्रयोगांवरच प्रकाश टाकत नाही तर आपले जीवन अखिल मानवजातीच्या उन्नतीसाठी समर्पित करणार्‍या डॉ. टेस्ला यांचे मानवी पैलू देखील परिचित करून देते. हे पुस्तक मूळत: ‘दैनिक प्रत्यक्ष’ या मराठी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लेखांचे संकलन आहे. वाचकांच्या सोयीसाठी या पुस्तकातील लेखांचे भाषांतर आणि पुनर्प्रकाशन करण्यात आले आहे.

Know more ...

Login

Login to add products to shopping cart or read sample copy

Register

Register if you are a new user and then Login to add products to shopping cart or read sample copy